मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली असून, तिने तिच्या स्तनांमधून सिलिकॉन कप बाहेर काढले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे यातील प्रत्येक कपचे वजन ८२५ ग्रॅम आहे. शर्लिनने यापूर्वी अनेक वेळा सोशल मीडियावर कॉस्मेटिक सर्जरीबद्दल उघडपणे सांगितले आहे. त्यानंतर आता हे कप काढल्याचे समोर आले आहे.
शर्लिन चोप्रा हिने आधी लिप फिलर्स काढले होते आणि आता ती तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढत आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये शर्लिनने तरुणींना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि जसे आहेत तसेच नैसर्गिक राहण्याचा सल्ला दिला आहे. १५ नोव्हेंबर रोजी शर्लिनने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये म्हटले आहे की, “माझ्या छातीवरून हा जड ओझे काढले गेले आहे. त्याचे वजन ८२५ ग्रॅम आहे. आता मला फुलपाखरासारखे हलके वाटते.”
मी आपल्या देशातील तरुण पिढीला आवाहन करते की, जर त्यांना सोशल मीडियावर काही चुकीचे घडताना दिसले तर त्यांनी बाहेरील गोष्टीकडे लक्ष दिले नाही पाहिजे. तुम्हाला जे काही करावे लागेल ते करा, त्याचे फायदे आणि तोटे तोलून घ्या. तुमच्या कुटुंबाचा आणि बाहेरील वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, असे तिने म्हटले आहे.


