मुंबई : अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनात आधिराज्य गाजवलं होतं. पण, आता अनेक वर्षांनी त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे वाद निर्माण झाला होता. ज्यामुळे तिला आखाड्यातून काढून टाकण्यात आले. असे जरी असले आता त्यांच्या एका विधानाने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
ममता कुलकर्णी या त्यांच्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. जेव्हा अंडरवर्ल्डशी त्याच्या संबंधांच्या बातम्यांना वेग आला तेव्हा त्यांची कारकिर्दीला मोठा ब्रेक लागला. मात्र, यात किती तथ्य आहे हे सांगणं अद्यापही कठीण आहे. आता अनेक वर्षांनंतर ममता कुलकर्णी यांनी अंडरवर्ल्डशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल विधान केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ममताने म्हटले की, “माझा दाऊद इब्राहिमशी काहीही संबंध नाही.”
तसेच कुणाचे तरी नाव नक्कीच घेतले होते. पण दाऊदने देशात कोणतेही बॉम्बस्फोट किंवा देशविरोधी कारवाया केल्या नाहीत. मी त्याच्या बाजूने नाही, पण तो दहशतवादी नाही. तुम्हाला फरक समजला पाहिजे. जेव्हा तुम्ही दाऊदचा उल्लेख करता, ज्याच्याशी माझे नाव जोडले जाते, तेव्हा त्याने कधीही मुंबईत बॉम्बस्फोट घडवले नाहीत. तुम्ही कधी याबद्दल ऐकले आहे का? मी दाऊदला कधीही भेटले नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही तिने सांगितले.


