मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण आणि ज्वेलरी डिझायनर सबा अली खानने १ मे रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आता समोर आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खानने तिची बहीण सबाच्या वाढदिवसाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोहा अली खानने तिची मोठी बहीण सबा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून संपूर्ण पटौदी कुटुंबाची एक झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनीही या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. फोटो पोस्ट करताना सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले, “थोडा उशीर झाला, पण प्रतीक्षा सार्थक ठरली – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपा.” सबा अली खानने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने लिहिले, “१ मे, २०२६. कुटुंबासोबतचे सुंदर क्षण… माझा ५० वा वाढदिवस… आणि मी त्याचा पुरेपूर आनंद घेतला. पुढे अजून बरेच काही घडायचे आहे, पण एका अद्भुत प्रवासाची ही एक खूप खास सुरुवात होती”.
सोहा, या स्नेहभोजनाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद. बेबो आणि भाई, सुंदर फुगे, कार्ड आणि भेटवस्तू दिल्याबद्दल धन्यवाद. इन्नीचे कार्ड आणि जेह बाबांची व्हॉइस नोट खरोखरच खास होती. तुम्हा सर्वांनी हा दिवस अविस्मरणीय बनवला. आपण या वर्षाची सुरुवात एका उत्तम प्रकारे केली आहे.


