मुंबई : बॉलीवूड आणि दक्षिण भारतातील अनेक प्रमुख चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मसह थिएटरमध्ये रिलीज झाले. चाहते या स्टार-स्टड चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत होते. आता हे चित्रपट रिलीज झाले आहेत. जर तुम्हाला थिएटरमध्ये चित्रपट पाहायचे असतील तर ते आता पाहता येणार आहे.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जॉली एलएलबी ३’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या दोन मोठ्या स्टार्स व्यतिरिक्त, अमृता राव, हुमा कुरेशी, बोमन इराणी आणि अन्नू कपूर देखील दिसतील. या चित्रपटात दोन वकिलांमधील संघर्ष दिसणार आहे. तर २००० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात घडलेला ‘निशांची’ हा जुळ्या भावंड बबलू आणि डबलू यांच्या कथेवर आधारित आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरे यांची नात ऐश्वर्या ठाकरे पदार्पण करत आहे.
याशिवाय, ‘अजय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित असून, तो चित्रपटही थिएटरमध्ये रिलीज झाला. यात अनंत जोशी, परेश रावल आणि दिनेश लाल उर्फ निरहुआ सारखे कलाकार आहेत. हे सर्व कलाकार आपल्या अदाकारीने चर्चेत आहेत. ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज झाला आहे.


