Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृतिक रोशन दिसणार ‘डॉन 3’ मध्ये?; रणवीर सिंगने नकार दिल्यानंतर आता…

हृतिक रोशन दिसणार ‘डॉन 3’ मध्ये?; रणवीर सिंगने नकार दिल्यानंतर आता…

मुंबई : अभिनेता अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशानंतर ‘डॉन ३’ची चर्चा सुरु झाली आहे. रणवीर सिंग या चित्रपटात असेल, असे म्हटले जात होते. मात्र, रणवीर सिंगने हा चित्रपट करणार नसल्याचे सांगितले. परिणामी, फरहान अख्तरच्या चित्रपटात कोण भूमिका साकारणार याबद्दल बरीच उत्सुकता आहे. हृतिक रोशन डॉनची भूमिका करू शकतो.

डॉनची भूमिका यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरुख खान यांनी साकारली होती. ही अफवा ऐकून चाहते खूप आनंदी झाले. चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘डॉन ३’ साठी हृतिक रोशन कोणत्याही चर्चेत नाहीये. त्याने टीमसोबत कोणतीही मीटिंगही केलेली नाही. रणवीरच्या अचानक बाहेर पडण्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या निर्मितीबाबत पुनर्विचार करावा लागला आहे आणि पुन्हा नियोजन करावे लागले आहे.

दिग्दर्शक फरहान अख्तरच्या चित्रपटाशी संबंधिताने माहिती दिली की, सध्या सर्वजण उत्सवाच्या मूडमध्ये आहेत आणि गोष्टी पुढच्या वर्षीच सुरू होतील. नवीन मुख्य भूमिकेसाठी पटकथेत बदल करणे आवश्यक आहे. एकदा ते अंतिम झाले की, निर्माते नवीन ‘डॉन’ शोधण्यास सुरुवात करतील. हृतिक रोशन हा एक उत्तम पर्याय असू शकतो, परंतु सध्यातरी यावर अधिक चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!