Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘कमल हसन आणि रजनीकांत यांचं नातं भावासारखं, दोघांच्यात कधीही स्पर्धा नाही’; भाची सुहासिनी यांचा दावा

‘कमल हसन आणि रजनीकांत यांचं नातं भावासारखं, दोघांच्यात कधीही स्पर्धा नाही’; भाची सुहासिनी यांचा दावा

मुंबई : तामिळ सुपरस्टार कमल हासन आणि रजनीकांत अखेर ४६ वर्षांनी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही कलाकारांनी अनेक तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता दोघेही लोकेश कनगरजच्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.

कमल हसन यांची भाची सुहासिनी मणिरत्नमने दुबईतील एका कार्यक्रमात दोन्ही स्टार्समधील नात्याबद्दल सांगितले. कमल हसन आणि रजनीकांत यांचे नाते वर्षानुवर्षे जुने आहे. ते खरोखर भावांसारखे आहेत. ते एकमेकांची विचारपूस करतात. कधीकधी शूटिंग दरम्यान कमल यांचा अपघात झाला तर रजनी सर मला फोन करतात आणि कमल यांच्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस करतात. या दोघांचे नाते खूपच जवळचे आहे. मित्र असूनही भावाप्रमाणे ते राहतात.

कमल आणि रजनीकांत यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचे दिसून आले. कमल हसन यांनी त्यांच्यात आणि रजनीकांत यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही. त्यांच्यात स्पर्धा आहे असा फक्त एक समज आहे. आम्हाला हे करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. तो असा आहे, मीही असा आहे. आम्हाला नेहमीच एकमेकांचे चित्रपट निर्माण करायचे होते. त्यामुळे आमच्यात स्पर्धा असल्याच्या चर्चा योग्य नाहीत, असेही त्याने सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!