Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘धुरंधर’च्या त्सुनामीत ‘किस किसको प्या करूं 2’ गेला वाहून; चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता म्हटलं…

‘धुरंधर’च्या त्सुनामीत ‘किस किसको प्या करूं 2’ गेला वाहून; चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता म्हटलं…

मुंबई : धुरंधर चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्याच त्सुनामीत कॉमेडियन कपिल शर्माचा ‘किस किसको प्या करूं २’ वाहून गेला आहे. कपिलच्या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. कॉमेडियन कपिल शर्माने नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.

गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘किस किसको प्यार करूं २’ हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नवीन वर्षीच निर्मात्यांनी घोषणा केली की, कपिल शर्माचा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट ९ जानेवारी रोजी पुन्हा प्रदर्शित होईल. यावेळी त्यांचा चित्रपट चांगली कमाई करेल, असा विश्वास निर्माते रतन जैन यांनी व्यक्त केला. त्यांनी कपिलचा चित्रपट शुद्ध मनोरंजन असल्याचे म्हटले. ‘किस किसको प्यार करूं २’ हा चित्रपट कुटुंबांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रेम, हास्य आणि सकारात्मक पुनरावलोकनांमुळे त्याचे सार्वत्रिक आकर्षण वाढले आहे.

अजूनही या चित्रपटाला मागणी आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की तो चित्रपटगृहांमध्ये परत आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आता लोकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा त्याचा विनोद अनुभवता येईल. हास्य आणि कौटुंबिक मनोरंजनाचा उत्सव साजरा करणारा चित्रपट परत आणताना आम्हाला आनंद होत आहे.

थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

कपिलच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. धुरंधर त्सुनामीचा त्याच्या कमाईवर परिणाम झाला. कपिलच्या किस किसको प्यार करूं २ ने अपेक्षेनुसार चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.८५ कोटी कमाई केली. दुसऱ्या सोमवारी चित्रपटाने ११.९ कोटी कमाई केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!