Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ फिनालेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जसजसा शो पुढे जात आहे, तसतसा हा शो आणखीनच रंजक होत आहेत. मागच्या आठवड्यात ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये डबल एविक्शन झालं. निलम गिरी आणि अभिषेक बजाज शोमधून बाहेर झाले. शोमधील एकेक स्पर्धक घरातून बाहेर पडत आहेत. त्याचत आता मृदूल तिवारी घराबाहेर गेला आहे.
अनेकांना टॉप 3मधली दमदार सदस्य हा अभिषेक वाटत होता. प्रणितने त्याला डाबलून अशनूरला सेव्ह केल. त्याच्या जाण्याने अनेकांनी शो मेकर्सवर नाराजी व्यक्त केली. आता सेम गोष्ट मृदूल विषयी झाल्याच अनेकांच म्हणण आहे. एकामागोमाग एक दमदार स्पर्धक घराबाहेर जात आहेत. मेकर्सने ट्विस्ट आणला आणि बुधवारी सीझनचं पहिलं मिड-वीक एविक्शन पार पडलं. मिड-वीक एविक्शनमध्ये यूट्यूबर मृदुल तिवारीचा शोमधून प्रवास संपला. मृदुलचं एलिमिनेशन लाइव्ह ऑडियन्सच्या वोटिंगद्वारे झालं.
‘बिग बॉस १९’ च्या घरात कॅप्टन्सी टास्कदरम्यान अनेक लोकांनी शोमध्ये थेट मतदान केलं, ज्यात गौरव खन्ना आणि शहबाज बदेशा यांना सर्वात जास्त वोट्स मिळाले आणि ते कॅप्टन्सीचे दावेदार बनले. याशिवाय, मृदुलला सर्वात कमी वोट्स मिळाले आणि त्यामुळे त्याला या शोमधून बाहेर जावं लागलं. मृदुलच्या एविक्शनवेळी घरातील प्रत्येक सदस्याला धक्का बसला. सर्वाधिक दु:ख झालं ते गौरव खन्नाला.
शोमध्ये मृदुल गौरव खन्नाच्या खूप जवळ होता. मृदुल घरातून बाहेर गेल्यानंतर गौरव खन्ना आणि प्रणित यांनी वॉक करताना शो मेकर्सवर काही वक्तव्य केली. सर्वांचं एविक्शन मुख्य दरवाजाद्वारे झालं. सर्वांनाच १०-१५ मिनिटांचा वेळ मिळतो, पण मृदुला ‘आता इथूनच जा’ असं सांगण्यात आलं.’ यावर गौरव म्हणाला, “हे फक्त आपल्या ग्रुपबरोबरच झालं आहे. आवेज दरबार गेला, मग अभिषेक बजाजला तुला बाहेर काढाव लागलं. आता मृदुलही इथून गेला.” समोरच्या ग्रुपमधल्या लोकांना एकमेकांना वाचवण्यासाठी पॉवर देण्यात आल्या, पण आपल्याला काहीच नाही. यावर प्रणित म्हणाला, “हो, अगदी बरोबर बोलत आहेस, त्यांना पॉवर मिळाली आणि आपल्याला शाप…”
मृदुलच्या एविक्शननंतर आता घरात गौरव खन्ना, प्रणित मोरे, अशनूर कौर, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद, तान्या मित्तल, अमाल मलिक, शहबाज बदेशा आणि मालती चाहर हे सदस्य बाकी आहेत. आता यांपैकी ‘वीकेंड का वार’मध्ये कुणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


