मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होत आहे. त्यात तिसऱ्या आठवड्यासाठी बीएआरसीचे टीआरपी रेटिंग जाहीर झाले आहे. दर आठवड्याप्रमाणे, यावेळीही यादीत अनेक बदल झाले आहेत. गेल्या आठवड्यात टीआरपीमध्ये मागे राहिलेल्या शोजनी या आठवड्यात वर्चस्व गाजवले आहे. प्रेक्षक एकता कपूरच्या मालिकांना पसंती देत आहेत.
एकता कपूरच्या दोन्ही मालिका, ‘नागिन 7’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ टीव्हीवर आघाडीवर आहेत. गेल्या आठवड्यात नागिन तिसऱ्या क्रमांकावर असताना, आता ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ‘क्योंकी सास भी…’ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. दरम्यान, ‘अनुपमा’ने टॉप ३ मध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. ‘नागिन ७’ आणि ‘क्योंकी सास भी…’ मध्ये दाखवलेले ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहेत.
तुलसी आणि नागिन टीव्हीवर परतल्यापासून प्रेक्षक त्यांना पाहण्यास उत्सुक आहेत. एकेकाळी नंबर वन स्थानावर असलेला अनुपमा आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर घसरत आहे. मागील सीरीजच्या तुलनेत या मालिकेचे आकर्षण थोडे कमी झाले असण्याची शक्यता आहे.
पोपटलालचा नाही चालला लग्नाचा ट्रॅक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सीरीज या आठवड्यात सर्वात निराशाजनक कामगिरी करत होती. गेल्या आठवड्यात हा शो ११ व्या स्थानावर होता, जो या आठवड्यात १२ व्या स्थानावर घसरला. शोचा टीआरपी दररोज घसरत असल्याचे दिसून येते. सध्या, मालिका पोपटलालच्या लग्नाच्या ट्रॅकवर लक्ष केंद्रित करत होती.


