मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा यांचे नाव बऱ्याच काळापासून अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत जोडले गेले आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि अनेक प्रसंगी दोघेही एकमेकांना सपोर्ट करतात. असे जरी असले तरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही. आता दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रश्मिका आणि विजय हैदराबाद विमानतळावर एकत्र दिसले. यादरम्यान, दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. विजय आणि रश्मिका हे कपल दिसले. विजय हा लांब टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसला आणि दोघांच्या चेहऱ्यावर मास्क होते. तर रश्मिका हलक्या पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसली. यादरम्यान, रश्मिका तिच्या पर्ससोबत दिसून आल्याने त्यांचा हा लूक त्यांच्या फॅन्ससाठी अत्यंत आवडीचा ठरला.
मात्र, जेव्हा त्यांच्यांवर कॅमेराची नजर पडली हेे पाहून दोघेही निघून गेले. चाहत्यांनी त्यांना सर्वोत्तम जोडी म्हटले आहे आणि त्यांच्या जोडीला इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडी म्हटले आहे.
विजयने रश्मिकासोबत लावली ‘इंडिया डे परेड’मध्ये हजेरी
अलीकडेच विजय देवेराकोंडा अमेरिकेत रश्मिका मंदान्नासोबत इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान, विजय आणि रश्मिकाच्या बॉन्डिंगबद्दल बरीच चर्चा झाली होती, जिथे विजय रश्मिकाला तिच्या टोपणनावाने हाक मारताना दिसला आणि रश्मिकाच्या डान्सचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.


