Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashish Vidyarthi Accident: प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीचा गुवाहाटीत अपघात; भरधाव दुचाकीने दिली धडक

Ashish Vidyarthi Accident: प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीचा गुवाहाटीत अपघात; भरधाव दुचाकीने दिली धडक

Ashish Vidyarthi Accident: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रूपाली बरुआ एका रस्ते अपघातात जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुवाहाटीतील ‘झू रोड’ परिसरात हा अपघात झाला. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मध्यरात्री हॉटेलबाहेरच घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरुआ गुवाहाटीतील ‘अॅड्रेस हॉटेल’मध्ये मुक्कामाला होते. रात्री 12:00 वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपून हे जोडपे हॉटेलबाहेर रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी चांदमारी भागातून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी दोघेही जखमी झाले, तर दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस कारवाई आणि उपचार

घटनेची माहिती मिळताच गीतानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरुआ यांच्यावरही त्वरित प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.

आशिष विद्यार्थी हे केवळ हिंदीच नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत 11 हून अधिक भाषांमधील 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 1994 मध्ये आलेल्या ‘द्रोहकाल’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘वास्तव’, ‘बर्फी’ आणि ‘हैदर’ सारख्या चित्रपटांतील त्यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या. अभिनयाव्यतिरिक्त, ते एक उत्तम वक्ता आणि लोकप्रिय फूड-ट्रॅव्हल व्लॉगर आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!