मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्रिशाचे नाव अभिनेता-राजकारणी थलपथी विजयसोबत जोडले जात आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे त्यांच्या लग्नाची घोषणा करू शकतात. दरम्यान, त्रिशा सिनेमा इंडस्ट्री सोडत असल्याचेही वृत्त समोर येत आहे.
अनेक निर्मात्यांनी असे वृत्त दिले आहे की, त्रिशा अभिनय सोडण्याचा विचार करत आहे. मात्र, अभिनेत्री त्रिशाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पण, तिने अलीकडे कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही, ज्यामुळे तिच्या अभिनय सोडण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी, त्रिशाने सोशल मीडियावर प्रेमाबद्दल एक गूढ संदेश शेअर केला होता. तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये लिहिले होते, “प्रेम सर्वस्व नाही, तरीही प्रेमाशिवाय सर्व काही निरर्थक आहे.”
थलपथी विजयची पत्नी, संगीता सोरनालिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. वृत्तानुसार, विजय त्रिशाला डेट करत असून ते एकत्र वेळ घालवत आहेत. विजय आणि त्रिशाच्या नात्यामुळे अभिनेत्याची पत्नी नाखूश होती, म्हणूनच संगीताला विजयपासून घटस्फोट हवा आहे. विजयने अद्याप घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु तो अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये त्रिशासोबत दिसला आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्याला दुजोरा मिळतो.


