मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. त्यात २०२२ मध्ये आलेल्या ‘वध’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘वध २’ बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता निर्मित ‘वध २’ च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे त्याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
‘वध २’च्या निर्मात्यांनी इंस्टाग्राम हँडलवर १७ सेकंदांची क्लिप शेअर केली आहे. पोस्टरमध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता दिसत आहेत. त्या हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘संघर्ष नवीन आहे, कथा नवीन आहे, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. ६ फेब्रुवारी रोजी शोधा.’ ‘वध २’चे दिग्दर्शन आणि लेखन जसपाल सिंग संधू यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. लव फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती होत आहे.
संजय मिश्रा यांच्या ‘वध’ चित्रपटात एका गुन्ह्याची कथा होती. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या एका निवृत्त शाळेतील शिक्षकाला त्याचे कर्ज फेडण्यासाठी वारंवार त्रास दिला जातो. जेव्हा तो एका मद्यपीची हत्या करतो तेव्हा त्याच्या अडचणी वाढतात. त्यानंतर, पती-पत्नी एकत्र येऊन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावल्याचे दिसून आले. त्यानंतर आता त्याचा दुसरा पार्ट आणण्यात आला.


