Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Daya Dongre: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Daya Dongre: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Daya Dongre Passes Away: मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले आहे. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असून, त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ‘मायबाप’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील त्यांच्या प्रभावी भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. दया डोंगरे यांच्या जाण्यानंतर मराठी मनोरंजनविश्वातून त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी दया डोंगरे यांचा कल संगीताकडे होता. आकाशवाणी गायनस्पर्धेत त्यांनी आपल्या सुरेल आवाजाची छाप पाडली होती. पण नंतर अभिनयाकडे वळून त्यांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास गाजवला. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई यमुताई मोडक आणि आत्या, प्रसिद्ध अभिनेत्री-गायिका शांता मोडक यांच्याकडून मिळाले.

अवघ्या सोळाव्या वर्षी मो. ग. रांगणेकर यांच्या ‘रंभा’ या नाटकातून त्यांनी प्रथम रंगभूमीवर पाऊल ठेवले आणि त्यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला. ११ मार्च १९४० रोजी अमरावती येथे जन्मलेल्या दया डोंगरे यांनी वडिलांच्या बदलीमुळे धारवाडमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. नाट्यशास्त्रात औपचारिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला होता.

विवाहानंतर शिक्षण अपूर्ण राहिले, तरी पती शेखर डोंगरे यांच्या पाठबळामुळे त्यांची अभिनय कारकीर्द अखंड सुरू राहिली. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘लेकुरे उदंड जाली’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी अभिनयाची छाप सोडली. पुढे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

‘मायबाप’ आणि ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच २०१९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दया डोंगरे यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीने एक संवेदनशील, समर्पित आणि बहुआयामी अभिनेत्री गमावली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!