मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आहेत त्यांची चर्चाही अनेकदा होत असते. त्यापैकी एक म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. चाहते त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. हे जोडपे आपले वैयक्तिक आयुष्य कॅमेऱ्याच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र, अनेक इंटरव्ह्यूमध्ये हा अभिनेता अनेकदा आपल्या पत्नीचे कौतुक करताना दिसतो.
आता अभिषेक बच्चन याने ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर चालण्याबद्दल भाष्य केले. अभिषेक म्हणाला की, ऐश्वर्याच्या बाजूने चालताना त्याला खूप अवघडल्यासारखे वाटते. आपल्या पत्नीचे सौंदर्य आणि अनुभव पाहता, याची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. तुम्ही माझ्या पत्नीला पाहिले आहे का? तुम्ही तिला कधी रेड कार्पेटवर पाहिले आहे का? रेड कार्पेटवर चालणे ही माझ्यासाठी सर्वात भीतीदायक गोष्ट आहे. आणि जर मला त्यांच्यासोबत चालावे लागले, तर ते आणखीनच भीतीदायक होते. ते सर्व अनुभवी आहेत, या कामात खूपच पारंगत आहेत. मी तर यामध्ये नवीन आहे’.
रेड कार्पेटवर जाताना मला नेमकं कसं थांबावं हेच अनेकदा समजत नाही. मला काय करावे ते कळत नाही. मी माझे हात खिशात घालावेत का? मला खूप अवघडल्यासारखं वाटतं. म्हणूनच फोटोग्राफर अनेकदा म्हणतात, सर, थोडं तरी हसा, असे म्हणत अभिषेक बच्चन याने यावर भाष्य केले.


