महाराष्ट्र जागरण डेस्क: वर्कआउट रूटीनमध्ये ज्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते ती म्हणजे स्ट्रेचिंग, अनेकदा लोक स्ट्रेचिंग करत नाहीत. त्याच वेळी, काही लोकांना वर्कआउट रूटीननंतर फक्त कूलडाउन म्हणून स्ट्रेचिंग करायला आवडते, परंतु स्ट्रेचिंग हे कूल डाउनपेक्षाही अधिक काही आहे. प्रत्येकाने व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायूंना आराम देण्यास आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत होऊ शकते. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला वर्कआउट केल्यानंतर शरीराच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो.
स्ट्रेचिंगमुळे स्नायूंची लवचिकता सुधारते, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता देखील कमी होते. त्याच वेळी, आपल्या मूव्हमेंट्सही फास्ट होऊ लागतात. वर्कआउटनंतर स्ट्रेचिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठीच आज या लेखात जाणून घेऊयात वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग केल्याने कोणते फायदे मिळू शकतात याविषयी.
स्ट्रेचिंग हा व्यायामानंतर स्नायूंना आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा स्नायू घट्ट जाणवू लागतात. परंतु जेव्हा आपण स्ट्रेचिंग करतो तेव्हा स्नायूंना आराम मिळतो आणि लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.
वर्कआउट केल्यानंतर आपले अवयव दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. जी आपल्या सर्वांना भेडसावत असते. तुम्हाला असे वाटत असेल की वर्कआउट केल्यावर दुसऱ्या-दोन दिवसांत शरीरात खूप वेदना आणि घट्टपणा जाणवतो. वर्कआउटनंतर स्नायूंमध्ये होणारा हा त्रास आहे. पण जेव्हा तुम्ही वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग करता तेव्हा याचा तुम्हाला खूप फायदा होतो. यामागील कारण असे की, स्ट्रेचिंमुळे रक्तप्रवाह वाढू शकतो आणि तुमच्या स्नायूंना आराम मिळून वेदना कमी होऊ शकतात.


