Today मंगळवार, 4th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

यकृताच्या आरोग्यासाठी हळद ठरते फायद्याची; यकृत स्वच्छ ठेवतेच शिवाय सक्रियही राहते…

यकृताच्या आरोग्यासाठी हळद ठरते फायद्याची; यकृत स्वच्छ ठेवतेच शिवाय सक्रियही राहते…

आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाय करतो. त्यात घरगुती उपायांना जास्त प्राधान्य दिलं जातं. असे असताना स्वयंपाकघरात हळद हा एक जादुई मसाला आहे, जो कोणत्याही पदार्थाला पूर्ण बनवतो. तो केवळ त्याच्या रंग आणि चवीसाठीच नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही अनेकदा जखमांवर हळदीची पेस्ट लावता हे त्याचे गुण आहेत.

हळद ही यकृताच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरते. यकृत स्वच्छ, सक्रिय आणि निरोगी ठेवण्यास मदत करणारे हळदीचे गुणधर्म आहेत. हळदीचे सेवन केल्याने यकृताचे आरोग्य सुधारते. हळद एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जी यकृताला नैसर्गिक संरक्षण देते. हळदीतील कर्क्यूमिन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ते यकृताच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते आणि यकृताची जळजळ कमी करते. ते फॅटी लिव्हरसारख्या समस्या टाळण्यास मदत करते, म्हणूनच आयुर्वेदात हळदीला नैसर्गिक यकृत टॉनिक मानले जाते.

हळदीच्या नियमित सेवनाचे अनेक फायदे आहेत. त्यात यकृताचे कार्य सुधारते, पचनक्रिया मजबूत होते, शरीराची डिटॉक्स प्रक्रिया वेगवान होते, यकृत हलके आणि सक्रिय वाटते, फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो, ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय यकृत स्वच्छ आणि मजबूत करण्यास मदत करतात.

असा करा हळदीचा वापर…

दररोज रात्री कोमट दुधासोबत एक चमचा हळद घेतल्याने यकृताच्या समस्यांपासून आराम मिळतो. जास्त प्रमाणात हळदीचे सेवन फायदेशीर न ठरता अपायकारक ठरू शकते. त्यामुळे पोटात जळजळ किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!