मिस युनिव्हर्स २०२५ हा इव्हेंट सध्या वादाच्या भोवऱ्यात दिसत आहे. अंतिम फेरीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, दोन जजेसनी शोमधून राजीनामा दिला आहे. हेराफेरीचा आरोप करत जज ओमर हार्फोचे यांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांना धक्का दिला. आता, ओमरनंतर आणखी एका जजने शोमधून राजीनामा दिला आहे. अंतिम फेरीच्या फक्त तीन दिवस आधी दोन जजच्या जाण्याने शो आता आणखी कठीण झाला आहे.
ओमरनंतर आणखी एका जजने राजीनामा दिला. ओमरनंतर फ्रेंच फुटबॉल खेळाडू क्लॉड माशेलनेही इन्स्टाग्रामवर एका छोट्या पोस्टमध्ये राजीनामा जाहीर केला आहे. त्याने लिहिले आहे की, वैयक्तिक कारणांमुळे तो मिस युनिव्हर्स २०२५ च्या अंतिम फेरीत सहभागी होऊ शकणार नाही. क्लॉड माशेल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला तुम्हाला कळवताना दु:ख होतंय की, वैयक्तिक कारणांमुळे मी मिस युनिव्हर्स २०२५ शोमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. हा निर्णय सोपा नव्हता, कारण मी मिस युनिव्हर्स आणि विविधतेच्या मूल्यांचा आदर करतो”.
दरम्यान, सोशल मीडिया पोस्टमध्ये ओमरने दावा केला की, ज्युरी पॅनेलमधील एका सदस्याचे एका स्पर्धकासोबत प्रेमसंबंध होते. टॉप ३० स्पर्धकांची अनधिकृतपणे निवड करण्यात आली होती. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने अधिकृत निवेदनात ओमरचे सर्व आरोप फेटाळून लावले. शिवाय, ओमरला मिस युनिव्हर्समधून कायमची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता मिस युनिव्हर्स चर्चेत आला आहे.


