मेष: अनावश्यक चिंता करण्याचे टाळावे. दैनंदिन कामास तुमच्याकडून दिरंगाई होणार आहे. काहींचा करमणुकीकडे कल राहील. अस्वस्थता जाणवेल. खर्च वाढणार आहेत.
वृषभ : अनेकांशी सुसंवाद साधाल. काहींना विविध लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल.
मिथुन : आज तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल, मानसिक अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवास सुखकर होतील.
सिंह: आज आपल्याला विनाकारण मनस्ताप होण्याची शक्यता आहे. आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित अडचणी जाणवतील.
कन्या: मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अनेक कामात सुयश मिळवणार आहात तुमच्या वागण्याबोलण्याचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. काही बाबतीत आपली चिडचिड होणार आहे. प्रवास आज नकोत. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक: काहींना आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींबरोबर जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय घ्याल.
धनु: मानसिक आशावाद वाढेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कामात सुयश लाभेल.
मकर: नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.
कुंभ : कौटुंबिक सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे एखादी गुप्तवार्ता समजेल. व्यवसायातील जुनी येणी वसूल होणार आहेत.
मीन: मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होतील, उत्साही व आनंदी रहाल.


