Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता मेसेज येताच कळणार तो स्पॅम आहे की कामाचा ? केंद्र सरकारने उचलले हे मोठं पाऊल

आता मेसेज येताच कळणार तो स्पॅम आहे की कामाचा ? केंद्र सरकारने उचलले हे मोठं पाऊल

नवी दिल्ली: दिवसभरात तुम्हाला असे अनेक मेसेज मिळतील, ज्यांचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. असे अनेक मेसेज असतात, ज्यामध्ये क्लिक करताच हॅक होऊ शकते अशा लिंक्सही असतात. मोबाईल युजर्सच्या या समस्येवर मात करण्यासाठी आता एक नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे स्पॅम आणि आवश्यक एसएमएस ओळखणे अधिक सोपे होणार आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) मंगळवारी माहिती दिली आहे की, टेलिकॉम ऑपरेटर्सने एसएमएस हेडरमध्ये नवीन सफिक्स (कॅरेक्टर्स) जोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे संदेश पाठविणाऱ्याची ओळख आणि त्याचे स्वरूप समजून घेणे सोपे होईल.

नव्या प्रत्यय प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार

सीओएआयचे महासंचालक एस.पी. कोचर म्हणाले की, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी सुरुवातीला प्रमोशनल संदेशांसाठी ‘पी’, सेवेशी संबंधित संदेशांसाठी ‘एस’, व्यवहारासाठी ‘टी’ आणि सरकारशी संबंधित संदेशांसाठी ‘जी’ लागू करण्याची प्रणाली लागू केली आहे. सुधारित टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (टीसीसीसीपीआर) अंतर्गत १२ फेब्रुवारी २०२५ पासून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

यामुळे पारदर्शकता आणि ग्राहक संरक्षण मजबूत झाले आहे. कोणता मेसेज प्रमोशनल आहे, कोणता सेवेशी संबंधित आहे आणि कोणता ट्रान्झॅक्शनल किंवा गव्हर्नमेंटल आहे हे आता ग्राहक लगेच ओळखू शकतील. यामुळे स्पॅम लक्षणीयरीत्या कमी होईल आणि फसवणुकीला आळा बसेल.

व्हॉट्सॲप , टेलिग्रामसारख्या ॲप्सकडून वाढत्या स्पॅमबाबत चिंता कायम

मात्र, व्हॉट्सॲप , टेलिग्रामसारख्या ओटीटी (ओव्हर-द-टॉप) मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून वाढत्या स्पॅम आणि फसवणुकीच्या मेसेजिंगवर कोचर यांनी चिंता व्यक्त केली. “संपूर्ण संप्रेषण परिसंस्थेचे नियमन केल्याशिवाय कोणताही स्पॅम नियंत्रण उपाय पूर्णपणे प्रभावी ठरू शकत नाही. या अनियंत्रित ओटीटी प्लॅटफॉर्मचा स्पॅमर्सकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे त्यांचे मत आहे. मोबाईल युजर्सला अनावश्यक आणि फसव्या मेसेजेसपासून वाचवण्यासाठी हे नवे पाऊल मोठी भूमिका बजावणार आहे. तथापि, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नियंत्रण अजूनही एक आव्हान आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!