Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चिखली, तळवडेमध्येही १२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

चिखली, तळवडेमध्येही १२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिखली, तळवडे आणि रुपीनगर येथील परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पत्रा शेडचे ६८२१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १२ अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात आली. चिखली, रुपीनगर आणि तळवडे येथील कारवाईमध्ये फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

तसेच कारवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निष्कासन कारवाईमध्ये पोकलेन व जेसीबी यांचा वापर करण्यात आला. शिवाय यावेळी इतर महापालिका यंत्रणेसह पोलीस प्रशासनाचे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई मध्ये चिखली, तळवडे आणि रुपीनगर येथील अनधिकृत बांधकामांचा समावेश होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!