पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तसेच ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. विविध वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी मोठी जबाबदारी सांभळली.
पत्रकारांतील अतिशय वेगाने काम करणारे आणि सर्व नवीन तंत्रज्ञान विद्युत गतीने आत्मसात करणारे धाडशी पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. सुवर्णपदक विजेता जलतरणपटू तसेच, मोडी लिपीमध्ये ते पारंगत होते. तसेच पत्रकारांच्या संघटनेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.


