Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Fake Medicines : तुम्ही ‘ही’ औषध घेताय का? महाराष्ट्रासह देशातील 167 औषधं चाचणीत फेल

Fake Medicines : तुम्ही ‘ही’ औषध घेताय का? महाराष्ट्रासह  देशातील 167 औषधं चाचणीत फेल

Fake Medicines : देशभरातील औषधांच्या गुणवत्तेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर २०२५ च्या तपासणीत एकूण १६७ औषधांचे नमुने निकृष्ट (NSQ) दर्जाचे आढळले असून ते चाचणीत फेल झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

तपासणीचा सविस्तर अहवाल

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (CDSCO) जारी केलेल्या ‘ड्रग अलर्ट’नुसार, औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी दरमहा ही प्रक्रिया राबवली जाते. यावेळच्या अहवालातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • एकूण फेल नमुने: १६७
  • CDSCO लॅब चाचणी: ७४ औषधे केंद्रीय प्रयोगशाळेच्या मानकांवर उतरली नाहीत.
  • राज्य प्रयोगशाळा (SDLT) चाचणी: ९३ औषधांचे नमुने निकृष्ट आढळले.
  • बनावट औषधे: गाझियाबाद (४), अहमदाबाद (१), बिहार (१) आणि महाराष्ट्र (१) येथे बनावट औषधांचे साठे सापडले आहेत.

बनावट औषधांचे मोठे रॅकेट

तपासणीदरम्यान असे दिसून आले की, काही औषधे ही इतर मोठ्या आणि नामांकित कंपन्यांच्या ब्रँड नावाचा वापर करून बाजारात विकली जात होती. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) यावर कडक पाऊले उचलली असून, संबंधितांची चौकशी सुरू आहे. या कंपन्यांवर लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. चाचणीत फेल झालेल्या या १६७ औषधांची संपूर्ण यादी CDSCO च्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी औषधे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियमित तपासणी मोहीम

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राज्य नियामकांच्या सहकार्याने दरमहा ही ‘NSQ’ (Not of Standard Quality) आणि बनावट औषध शोध मोहीम राबवली जाते. बाजारातून निकृष्ट दर्जाची औषधे काढून टाकणे आणि रुग्णांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!