Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; पोलीस हवालदारच निघाला ड्रग रॅकेटचा सूत्रधार

Pune Crime:  पुण्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; पोलीस हवालदारच निघाला ड्रग रॅकेटचा सूत्रधार

Pune Crime:  पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात छापा टाकून तब्बल 10.5 किलो मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आंतरजिल्हा ड्रग रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलीस दलातील एका हवालदाराचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसाची ‘खाकी’ डागाळली; व्हॉट्सॲप कॉलने फुटले भांडे

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेला हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर (वय 39) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आले की, गुजर हा तस्करांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सॲप कॉलचा वापर करायचा. मात्र, काही सहकाऱ्यांनी हे कॉल रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागताच गुजरचे बिंग फुटले आणि त्याला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. तो या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पाच जणांच्या टोळीला बेड्या

हवालदार गुजरसह पोलिसांनी इतर चार तस्करांनाही अटक केली आहे. शादाब रियाज शेख (रा. शिरूर) याच्या गॅरेजवर छापा टाकून 1 किलो MD जप्त करण्यात आले. ज्ञानदेव ऊर्फ माउली शिंदे (रा. पारनेर), महेश दादाभाऊ गायकवाड (रा. श्रीगोंदा), हृषीकेश प्रकाश चित्तर (रा. पारनेर) या सर्वांकडून एकूण 9.5 किलो अतिरिक्त अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा –  Pune Cycling Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळून जखमी

अशी झाली कारवाई

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत होती. शिरूरमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने सापळा रचला. प्रथम गॅरेज चालक शादाबला पकडल्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले. जप्त केलेल्या साडेदहा किलो मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. पोलीस आता हे ड्रग्स नेमके कोठून आणले जात होते आणि पुणे शहरात कोणाला पुरवले जाणार होते, याचा शोध घेत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!