Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाहतूक कोंडीत पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर! पुणेकरांनी वर्षभरात रस्त्यावरच वाया घालवले १५२ तास

वाहतूक कोंडीत पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर!  पुणेकरांनी वर्षभरात रस्त्यावरच वाया घालवले १५२ तास

Pune Traffic Ranking : जगभरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली असून, ‘टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५’ च्या ताज्या अहवालात पुण्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या ४९२ शहरांच्या सर्वेक्षणात पुणे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी पुणे चौथ्या स्थानी होते, त्या तुलनेत यावर्षी क्रमवारीत अंशतः सुधारणा झाली असली तरी कोंडीचे संकट कायम आहे.

भारतातील शहरांची स्थिती: बेंगळुरू जगात दुसऱ्या स्थानी

जागतिक स्तरावर मेक्सिको हे शहर वाहतूक कोंडीत पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर भारताची आयटी हब म्हणून ओळखली जाणारी शहरे आघाडीवर आहेत. बेंगळुरू भारतातील सर्वाधिक कोंडीचे शहर ठरले असून जागतिक क्रमवारीत ते दुसऱ्या स्थानावर आहे. पुणे देशात दुसऱ्या तर जगात पाचव्या स्थानावर आहे. मुंबईने आपली स्थिती बरीच सुधारली असून ते आता जागतिक स्तरावर १८ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या ५० शहरांमध्ये हैदराबाद, चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि दिल्ली या भारतीय शहरांचाही समावेश आहे.

हेही वाचा – Pune Cycling Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळून जखमी

१५ मिनिटांत गाठता येते ‘इतकेच’ अंतर

रस्त्यावरील वाहनांचा वेग किती संथ झाला आहे, हे या अहवालातील रंजक आकडेवारीवरून स्पष्ट होते. साधारणपणे १५ मिनिटांच्या प्रवासात नागरिक किती अंतर कापू शकतात, याचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:

बेंगळुरू: ४.२ किमी
पुणे: ४.५ किमी

वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा वेळ वाया

अहवालानुसार, २०२५ या वर्षभरात एका सरासरी पुणेकराचे तब्बल १५२ तास केवळ वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वाया गेले आहेत. गेल्या काही वर्षांतील पुण्याचा ‘ट्रॅफिक आलेख’पुण्यातील वाहतुकीची स्थिती सुधारण्याऐवजी वर्षागणिक अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!