Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Dengue Update: पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा विळखा वाढला; वर्षभरात सापडले ‘इतके’ रुग्ण; पालिकेची कठोर कारवाई

Pune Dengue Update: पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा विळखा वाढला; वर्षभरात सापडले ‘इतके’ रुग्ण; पालिकेची कठोर कारवाई

Pune Dengue Update: पुणे शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६) शहरात डेंग्यूचे तब्बल २,६४५ संशयित रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका प्रशासन ‘हायअलर्ट’वर आले असून शहरात प्रतिबंधात्मक मोहिमांना वेग देण्यात आला आहे.

पावसाळ्यात डेंग्यूचा सर्वाधिक कहर
महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत डेंग्यूचा प्रसार शिगेला पोहोचला होता. एकट्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ७६५ संशयित रुग्ण नोंदवले गेले. वर्षभरात १०९ रुग्णांचे डेंग्यू रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले असून २२ जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या कालावधीत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

हलगर्जीपणा करणाऱ्यांना ६ लाखांचा दंड
डासांची पैदास रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. बांधकाम साईट्स आणि सोसायट्यांना ३,०२९ नोटिसा बजावण्यात आल्या. साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडून पालिकेने ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

‘नॅशनल डेंग्यू डे’ निमित्त जनजागृती
आज (१६ मे) ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा होत असून, यंदाची संकल्पना ‘एक व्हा. कृती करा. निर्मूलन करा’ अशी आहे. डेंग्यूशी लढण्यासाठी केवळ प्रशासनावर विसंबून न राहता नागरिकांचा सहभाग अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ताप, अंगदुखी किंवा मळमळ जाणवल्यास घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस (Dry Day) पाळून पाण्याची भांडी स्वच्छ करा.
  • कुलर, कुंड्या आणि गच्चीवर पाणी साचू देऊ नका.
  • बाहेर जाताना पूर्ण कपडे वापरा आणि डास प्रतिबंधक क्रीमचा वापर करा.
  • पाण्याच्या टाक्या घट्ट झाकून ठेवा.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!