Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bharat Bandh : उद्या ‘भारत बंद’! देशव्यापी संपामुळे शाळा, बँका आणि बाजारपेठांवर बंद राहणार?

Bharat Bandh : उद्या ‘भारत बंद’! देशव्यापी संपामुळे शाळा, बँका आणि बाजारपेठांवर बंद राहणार?

Bharat Bandh : केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी बुधवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि देशातील प्रमुख कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ‘भारत बंद’मुळे रस्ते वाहतुकीपासून ते बँकिंग व्यवहारांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशव्यापी आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे असून प्रशासनानेही खबरदारीचे उपाय योजले आहेत.

संपाचे मुख्य कारण: नवीन ‘लेबर कोड’ आणि खाजगीकरणाला विरोध
कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार संहितांविरुद्ध (Labor Codes) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे नवे कायदे कामगारांची नोकरीची सुरक्षा धोक्यात आणणारे असून, यामुळे भांडवलदारांचे वर्चस्व वाढेल, असा आरोप संघटनांनी केला आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे खाजगीकरण थांबवणे, वीज दुरुस्ती विधेयक आणि ‘पीस’ (PEACE) कायदा रद्द करणे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी देखील बियाणे विधेयकाचा मसुदा मागे घेण्याची आणि मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे.

बँकिंग सेवांवर संपाचे सावट; एटीएम व्यवहारांवर येऊ शकतो ताण
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) या संपात सक्रिय सहभागी असल्याने सरकारी बँकांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प राहू शकते. SBI आणि IDBI सारख्या मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना संभाव्य त्रासाबाबत आधीच सतर्क केले आहे. संपाच्या काळात चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट बनवणे आणि थेट खिडकीवरील रोख व्यवहारांवर मर्यादा येऊ शकतात. जरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा तांत्रिकदृष्ट्या सुरू राहणार असल्या, तरी एटीएममधील रोकड लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठांची अनिश्चितता
शिक्षण संस्थांबाबत केंद्र सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली नसली तरी, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहेत. केरळ आणि कर्नाटकात बंदचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असल्याने तिथे शाळा बंद राहू शकतात. महाराष्ट्रातही ‘चक्का जाम’ आंदोलनामुळे बस आणि रिक्षा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. अनेक शहरांतील व्यापारी संघटनांनी प्रतिकात्मक बंद पुकारला असल्याने दुकाने आणि बाजारपेठा बंद राहण्याची चिन्हे आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवांना संपातून सवलत
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवांना या संपातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका आणि दूध पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील. रेल्वे आणि विमाने त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार चालतील, परंतु रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यास स्थानकांपर्यंत किंवा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!