Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gadchiroli Accident: अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघातात मृत्यू

Gadchiroli Accident: अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघातात मृत्यू

Gadchiroli Accident: गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे यांचे पाचगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. रविवारी रात्री हा अपघात झाला.

विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाची जोरदार धडक

प्राप्त माहितीनुसार, रविवारी खाजगी कामासाठी नागपूरला गेलेल्या गीताताई हिंगे या रात्री उशिरा गडचिरोलीकडे परतत होत्या. पाचगावजवळ त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पतींना किरकोळ दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा –पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुचं; स्कूल बस अन् कारची धडक

भाजपमध्ये दीर्घ काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारल्यामुळे गीताताई हिंगे यांनी काही महिन्यांपूर्वीच पक्ष सोडला होता. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या आगमनाने पक्षसंघटनात नवी ऊर्जा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा – Saptashrungi Gad Accident: सप्तशृंगी गडावर भीषण अपघात! संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली, 5 जण दगावल्याचा अंदाज

सामाजिक क्षेत्रातील प्रभावी कार्य

राजकीय क्षेत्रासह गीताताई हिंगे यांनी समाजसेवेलाही तितकाच प्राधान्य दिले. आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी गरजू नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवले. विशेषतः कोरोनाच्या काळात अन्न, औषधे आणि अत्यावश्यक साहित्य वितरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या परोपकारी कामाची जिल्ह्यात मोठी दखल घेतली गेली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!