पुणे : अंमलबजावणी संचालनालय ईडीने छापे टाकलेले वसई विरार पालिकेचे विद्यमान आयुक्त अनिल पवार यांचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. पवार हे काही वर्षे हे पुणे महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. सुमारे १५ ते १७वर्षापूर्वी पुणे पालिकेत उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले होते. दरम्यान, पवार यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर पुणे पालिकेतील अधिकारी धास्तावलेले आहे.
पवार यांना त्याकाळात सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना काळजीने ग्रासलेले आहे. ईडीने छापे टाकल्याने अनिल पवार हे १९९८ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी असून, ते सध्या सिडकोमध्ये अपर जिल्हाधिकारी पदी (निवड श्रेणी) प्रतिनियुक्तीवर सेवेत आहेत. अनिल पवार यापूर्वी बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे येथे अप्पर जिल्हाधिकारी, पुणे पालिकेमध्ये उपायुक्त, पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते.


