Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dharashiv Crime: धाराशिव हादरले! पोटच्या मुलीने आईचा खून पाहिला म्हणून बापाने लेकीलाही संपवले; पण 3 वर्षांच्या चिमुरड्याने दिली वडिलांविरोधात साक्ष

Dharashiv Crime: धाराशिव हादरले! पोटच्या मुलीने आईचा खून पाहिला म्हणून बापाने लेकीलाही संपवले; पण 3 वर्षांच्या चिमुरड्याने दिली वडिलांविरोधात साक्ष

Dharashiv Crime: चारित्र्याच्या संशयातून एका नराधम बापाने क्रूरतेचा कळस गाठल्याची खळबळजनक घटना बेरडवाडी येथे मंगळवारी पहाटे घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर, या कृत्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचाही बळी घेतला. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

पुरावा संपवण्यासाठी लेकीचीही हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजित अणप्पा वासुदेव याला आपल्या पत्नीच्या, लिंबाबाई वासुदेव, चारित्र्यावर संशय होता. मंगळवारी पहाटे त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केला. दुर्दैवाने, ८ वर्षांची मुलगी मानसी हिने वडिलांना आईवर वार करताना पाहिले. आपण पोलिसांना पकडले जाऊ या भीतीने आरोपीने स्वतःच्या पोटच्या लेकीवरही कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्घृण हत्या केली.

चिमुरड्याला सोडले, पण त्यानेच दिली साक्ष
पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर आरोपीचा ३ वर्षांचा मुलगा तिथेच रडत होता. आरोपीने रागाच्या भरात त्यालाही मारहाण केली, मात्र ‘हा लहान मुलगा काही सांगू शकणार नाही’ या भ्रमात राहून त्याने मुलाला जिवंत सोडले. त्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तो मुरूम पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी-मुलीचा कुणीतरी खून केल्याचा बनाव रचून तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

पोलिसी खाक्या आणि ३ वर्षांच्या मुलाचा इशारा
आरोपीच्या बोलण्यातील विसंगती पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची उलटतपासणी सुरू केली. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या ३ वर्षांच्या मुलाकडे विचारणा केली असता, त्याने रडत आपल्या वडिलांकडेच बोट दाखवले. चिमुरड्याच्या या खुणेमुळे आणि पोलिसांच्या कडक चौकशीमुळे आरोपी कोसळला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.

तपासाची चक्रे
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार आणि मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे पथकासह दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपी अजित वासुदेव याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बेरडवाडीसारख्या शांत परिसरात एकाच कुटुंबातील दोघांच्या हत्येमुळे भीतीचे वातावरण असून, अशा क्रूर प्रवृत्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!