Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Extra Summer Buses: खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला चाप! उन्हाळी सुट्टीत पुण्यातून सुटणार 74 जादा ST बस; पाहा तुमच्या गावाला जाणाऱ्या बसची वेळ

Extra Summer Buses: खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला चाप! उन्हाळी सुट्टीत पुण्यातून सुटणार 74 जादा ST बस; पाहा तुमच्या गावाला जाणाऱ्या बसची वेळ

Extra Summer Buses: उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई आणि गावी जाण्याची लगबग लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने प्रवाशांना मोठे ‘समर गिफ्ट’ दिले आहे. ऐन गर्दीच्या हंगामात खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी विभागाने ७४ अतिरिक्त बस रस्त्यावर उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कधीपासून सुरू होणार सेवा?
पुणे एसटी विभागाने प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी १० एप्रिल ते १० जून २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष नियोजन केले आहे. शाळा-महाविद्यालयांना लागलेली सुट्टी, कामगार आणि नोकरदारांचा गावी जाण्याचा ओढ लक्षात घेऊन या गाड्यांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.

या प्रमुख मार्गांवर धावणार ‘लालपरी’:
पुण्यातील विविध स्थानकांवरून खालील महत्त्वाच्या शहरांसाठी आणि तीर्थक्षेत्रांसाठी जादा बसेस उपलब्ध असतील:
तीर्थक्षेत्रे: अक्कलकोट, पंढरपूर, सप्तशृंगी गड, गोंदवले.
प्रमुख शहरे: कोल्हापूर, तासगाव, जळगाव, अकोला, अहमदपूर.

खाजगी ट्रॅव्हल्सच्या ‘लुटमारी’पासून सुटका
उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढली की खाजगी ट्रॅव्हल्सचालक अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारतात. एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना खिशाला परवडणाऱ्या दरात आणि सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने हतबल झालेल्या प्रवाशांसाठी या ७४ जादा गाड्या मोठा आधार ठरणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!