Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पूरग्रस्त शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! ऊस उत्पादकांना FRP कपातीचा फटका, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

पूरग्रस्त शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! ऊस उत्पादकांना FRP कपातीचा फटका, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

पुणे: राज्यातील महापुरामुळे शेतकरी हवालदिल झाले असतानाच आता सरकारच्या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर आणि मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने ऊसाच्या एफआरपी दरात थेट कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गाळप मंत्री समितीच्या बैठकीत ऊसाला प्रतिटन 15 रुपयांची कपात करण्याचा फतवा काढण्यात आला. यातून 5 रुपये थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना तर 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे वळवले जाणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यात गाळप हंगाम सुरू होत असताना या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राजू शेट्टींचा सरकारवर प्रहार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. ऊस उत्पादकांच्या खिशातून पैसे काढून मदत करणे म्हणजे दलालीच आहे. सरकारला असा कोणताही नैतिक अधिकार नाही, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी देण्याचा आदेश दिल्यानंतरही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्थगितीची मागणी केली. यावरून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होते, असा आरोपही राजू शेट्टींनी केला.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी लालपरीचा प्रवास महागला! राज्य परिवहन महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ लागू

ऊस उत्पादकांचे दुहेरी नुकसान

पूरामुळे आधीच एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटले असताना आता 15 रुपयांच्या कपातीचा बोजा ऊस उत्पादकांवर टाकला जात आहे. एका शेतकऱ्याच्या खिशातून पैसे काढून दुसऱ्याला देणे आणि त्यातून मुख्यमंत्री निधीकडे हिस्सा वळवणे म्हणजे शेतकऱ्यांवर जिझिया कर लादल्यासारखे आहे, असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत शेट्टींनी सरकारला इशारा दिला की, अशी दलाली आम्ही सहन करणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!