Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिवाळीपूर्वी लालपरीचा प्रवास महागला! राज्य परिवहन महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ लागू

दिवाळीपूर्वी लालपरीचा प्रवास महागला! राज्य परिवहन महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ लागू

ST Bus Fare Increase: राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत जास्त खर्च करावा लागणार आहे. महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत ही वाढ लागू होणार आहे. दरवाढीचा परिणाम थेट लाखो प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. दिवाळीच्या काळात गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटी बस हा प्रमुख आधार मानला जातो. मात्र, यंदा सुरक्षित मानला जाणारा हा प्रवास महाग होणार आहे.

शिवनेरी आणि शिवाई वगळता सर्व बसेसवर भाडेवाढ –

महामंडळाच्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई गाड्यांना वगळता सर्व बसेसवर 10 टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, ज्या प्रवासाचे भाडे 100 रुपये होते, तिथे आता प्रवाशांना 110 द्यावे लागणार आहेत.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

एसटी बसमधून गावोगावी, तसेच रातराणी गाड्यांतून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असताना दिवाळीपूर्वीच प्रवास महागल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा – सरकारची मोठी घोषणा! ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार

गेल्या वर्षीही एसटीच्या भाडेवाढीचा फटका बसला होता. 24 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेल्या निर्णयानुसार, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तब्बल 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे, सलग दुसऱ्या वर्षी प्रवाशांना महागड्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!