Pankaja Munde Dasara Melava: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. या परिस्थितीत सरकारने 2215 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे, जे लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. मात्र, या मदतीतून बळीराजाचे दु:ख पूर्णपणे दूर होऊ शकणार नाही. पूरग्रस्त भागातील घरांचे नुकसान पाहून मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि इतर राजकीय नेते मदतीसाठी धाव घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पंकजा मुंडेंच्या म्हणण्यानुसार, यंदाचा दसरा मेळावा केवळ उत्सव नाही तर पूरग्रस्त भागातील लोकांसाठी भावनिक आधार देण्याचा उपक्रम आहे.
हेही वाचा – Dasara Melava: दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण
पंकजा मुंडेंनी समर्थकांना पूरग्रस्तांसाठी भावनिक साद घालताना सांगितले की, दसऱ्याच्या दिवशी येताना चना डाळ, गुळ, गव्हाचे पीठ सोबत आणा. हे सर्व भगवान बाबांच्या चरणी अर्पण केले जाईल आणि नंतर ते पूरग्रस्त भागात वितरीत केले जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, मी भगवान बाबांच्या दर्शनासाठी येत आहे. आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही.
हेही वाचा – Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंचीही तोफ धडाडणार? मोठी अपडेट समोर
यंदा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, सावरगाव घाट, भगवान भक्ती गड येथे पार पडणार आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सांगितले की, यंदाचा दसरा मेळावा साधा असला तरी, ही पूरग्रस्तांसाठी दिलासा देण्याची संधी आहे.


