Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: ‘5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी करू…’; ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला बिश्नोई गँगचा धमकीचा कॉल

Pune Crime: ‘5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी करू…’; ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला बिश्नोई गँगचा धमकीचा कॉल

Pune Crime: आपल्या अंगावरील किलोभर सोन्यामुळे ‘गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सनी नाना वाघचौरे यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने लक्ष्य केले आहे. “तुझा बाबा सिद्दिकी करू, गुगलवर सर्च कर आमची दहशत काय आहे,” अशा शब्दांत ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात धाव घेत संरक्षणाची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
२५ जानेवारीच्या संध्याकाळी सनी वाघचौरे यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. सुरुवातीला त्यांनी तो उचलला नाही, मात्र पाठोपाठ “शुभम लोणकर कॉल मी” असा मेसेज आला. त्यानंतर झालेल्या संभाषणात समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकर अशी करून दिली. “गुगलवर सर्च कर आमची गँग कोण आहे, बाकी मेसेजवर बोलू,” असे सांगून त्याने फोन कट केला.

बाबा सिद्दिकींचा उल्लेख करत धमकी
सुरुवातीला सनी वाघचौरे यांनी याकडे थट्टा म्हणून दुर्लक्ष केले, मात्र २६ जानेवारीला आलेल्या मेसेजने त्यांची झोप उडवली. खंडणीची रक्कम देण्यासाठी केवळ ५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. जर पैसे दिले नाहीत, तर माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यासारखीच तुमची अवस्था करू, अशी थेट धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

कोण आहेत सनी वाघचौरे?
अंगावर नेहमी २ ते ३ किलो सोन्याचे दागिने घालण्यासाठी ते संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. ६ जानेवारी रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इंस्टाग्रामवर त्यांचे तब्बल २५ मिलियन (२.५ कोटी) फॉलोअर्स आहेत.

पोलीस कारवाई आणि तपास
धमकीच्या गंभीर स्वरूपामुळे सनी वाघचौरे यांनी पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून कोणी खंडणी उकळत आहे की खरंच गँगने हे कृत्य केले आहे, याचा तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. दरम्यान, त्यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगून तातडीने पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!