Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं! बीड रेल्वे सेवेला आज हिरवा झेंडा

बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं! बीड रेल्वे सेवेला आज हिरवा झेंडा

बीड: बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, ‘आज बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होत आहे. या क्षणाच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. अनेक दशकांपासून आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो, तो ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष तरतुदी करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच या मार्गासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.’

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर असून या प्रकल्पासाठी रेल्वे अर्थसंकल्पात 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मध्य रेल्वेचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. उद्घाटन सोहळ्यानंतर रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे रवाना झाली. कार्यक्रमात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे फोटो झळकावले गेले आणि समर्थकांनी ‘मुंडे साहेब अमर रहे’च्या घोषणा दिल्या.

हेही वाचा – Beed News : अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बीडमध्ये खळबळ

दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थनार्थ ‘दबंग खासदार’ असे फलक लावण्यात आले. त्यामुळे या दोन नेत्यांच्या छायाचित्रांनी कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मोठ्या गर्दीत या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार झाले. बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सुविधा वाढवणारा टप्पा नसून बीडच्या विकासासाठी नवी दिशा दाखवणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!