Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Harish Daroda: आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू; ‘या’ प्रकरणात करण्यात आली होती अटक

Harish Daroda: आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू; ‘या’ प्रकरणात करण्यात आली होती अटक

Harish Daroda: आदिवासी विकास महामंडळाच्या कोट्यवधींच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले हरेश दरोडा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे ते पुतणे होते. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तुरुंगात प्रकृती खालावली

भात खरेदी गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर हरेश दरोडा यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात असतानाच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काय होता १.६० कोटींचा घोटाळा?

२०२२-२३ मधील भात खरेदीत साकडबाव केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. तपासात असे समोर आले की, १३ हजार क्विंटलहून अधिक भात खरेदी झाल्याचे दाखवण्यात आले होते, पण प्रत्यक्षात ५ हजार १२० क्विंटल भात शिल्लकच नव्हता. शेतकऱ्यांच्या नावे बनावट पावत्या तयार करून सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते.

संबंधित कारवाई आणि आरोपी

याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणून हरेश दरोडा यांच्यासह तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, अविनाश राठोड आणि इतर तिघांवर कारवाई करण्यात आली होती. शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांच्या तक्रारीवरून ही पोलीस कारवाई झाली होती.

दरोडा यांनी आरोप फेटाळले होते

अटक होण्यापूर्वी हरेश दरोडा यांनी माध्यमांशी बोलताना घोटाळ्यातील आपला सहभाग नाकारला होता. “भात खरेदीचा थेट करार केंद्रप्रमुख जयराम सोगीर यांचा होता आणि त्यांनी या व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी घेणारे हमीपत्रही दिले होते,” असा दावा दरोडा यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी तपासानंतर त्यांना अटक केली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!