Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला अन् थेट मृतदेहच सापडला; शिरूरमध्ये 12 वर्षांच्या साईसोबत नेमकं काय घडलं?

Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला अन् थेट मृतदेहच सापडला; शिरूरमध्ये 12 वर्षांच्या साईसोबत नेमकं काय घडलं?

Pune Crime: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी-मांजरे गावात एका १२ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतलेला हा मुलगा खेळायला गेला आणि काही वेळातच त्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. साई मांजरे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे साई शाळेतून घरी आला होता. त्यानंतर कपडे बदलून तो मित्रांसोबत किंवा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची धाकधूक वाढली. शोधाशोध सुरू असतानाच गावाजवळील एका शेतात त्याचा निपचित पडलेला देह आढळला.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे –
प्राथमिक पाहणीत साईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. ही दुखापत एखाद्या अपघातामुळे झाली की यामागे काही घातपात आहे, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. घटनास्थळी पोलिसांसोबतच वनविभागाची टीमही दाखल झाली असून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा कोनातूनही तपास केला जात असल्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांचा संताप आणि पवित्रा
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत साईच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नाही आणि दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही किंवा तो जागेवरून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिरूर पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!