Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bribe Case: ‘इन्व्हेस्टिगेशन’ शब्द उच्चारता न येणाऱ्या पोलिसावर न्यायाधीशांचा संताप; म्हणाले, हे काय तपास करणार?

Bribe Case: ‘इन्व्हेस्टिगेशन’ शब्द उच्चारता न येणाऱ्या पोलिसावर न्यायाधीशांचा संताप; म्हणाले, हे काय तपास करणार?

ठाणे: लाच प्रकरणात अडकलेल्या ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या प्रकरणातील पोलिस तपासावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत, ‘इन्व्हेस्टिगेशन हा शब्द ज्या निरीक्षकाला नीट उच्चारता येत नाही, तो प्रकरणाचा युक्तिवाद कसा करणार?’ असा संतप्त सवाल केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीत तपासातील त्रुटींवरून पोलिसांना चांगलेच सुनावलं. न्यायाधीशांनी थेट इशारा दिला की, उद्याच्या सुनावणीला पोलीस निरीक्षक नको, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच उपस्थित करा. अन्यथा तुमच्यावरच कारवाई करावी लागेल.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी विचारले की शंकर पाटोळे यांचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे का. यावर तपास अधिकाऱ्याने ‘हो’ असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी तपासाच्या तपशीलांची मागणी करत विचारले, कारवाईचे डिटेल्स द्या, आणि व्हॉट्सअॅप कॉलची हिस्ट्री तपासली का? यावर तपास अधिकाऱ्याने उत्तर दिले की मुंबई विभागाने कारवाई करून सर्व माहिती गोळा केली आहे. यावर न्यायाधीश शिंदे म्हणाले, ‘यांना इन्व्हेस्टिगेशनबद्दल व्यवस्थित बोलताही येत नाही. असा अधिकारी प्रकरण हाताळतो आहे हेच चिंताजनक आहे. उद्या पोलीस अधीक्षकांना स्वतः उपस्थित करा आणि कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅप डिटेल्स न्यायालयात सादर करा.

हेही वाचा – Chief Justice B.R. Gavai : सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकीलाची संतापजनक प्रतिक्रिया, म्हणाले, जे करायला सांगितले ते…

जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर
शंकर पाटोळे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती, मात्र न्यायाधीश शिंदे रजेवर गेल्याने सुनावणी गुरुवारी पार पडली. आजच्या सुनावणीत तपासाच्या गुणवत्तेबाबत न्यायालयाने व्यक्त केलेली नाराजी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!