Today सोमवार, 10th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan Crime: कल्याण हादरलं! रॅपिडो चालकाने प्रवासी तरुणीला निर्जनस्थळी नेऊन नको ते कृत्य केलं

Kalyan Crime: कल्याण हादरलं! रॅपिडो चालकाने प्रवासी तरुणीला निर्जनस्थळी नेऊन नको ते कृत्य केलं

Kalyan Crime: कल्याणमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील सिंडिकेट परिसरात प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी गंभीर घटना समोर आली आहे. रॅपिडो बाईक सेवेच्या नावाखाली एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (वय 19) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाईक टॅक्सी सेवांवर गंभीर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, ओला आणि उबेरसारख्या बाईक टॅक्सी सेवांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा सेवांना देण्यात आलेले तात्पुरते परवाने रद्द करण्याबाबत विचार करण्यासाठी मोटार परिवहन विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयात होणार आहे.

हेही वाचा – Maval Rape and Murder Case: मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; पोलिसांची शोधमोहीम सुरू

प्राप्त माहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील एका तरुणीने जिमला जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक केली होती. आरोपीने तिच्या घराजवळून पिकअप केलं. मात्र प्रवास सुरू झाल्याचा संदेश न आल्याने तरुणीने चालकाकडे ओटीपीची चौकशी केली. याच दरम्यान चालकाने बाईक मुख्य रस्त्याऐवजी निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली.

हेही वाचा – Thane Crime News : कोर्टाजवळ महिलेवर सामूहिक अत्याचार; केकमध्ये गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

तरुणीने बाईकवरून मारली उडी

चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटताच तरुणीने प्रसंगावधान राखत चालत्या बाईकवरून उडी मारली. यात तिच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने तिला अंधारात ओढत नेण्याचा प्रयत्न केला आणि चाकू दाखवून धमकावले. त्याने तिच्याकडील सोन्याची व मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख लुटले. एवढ्यावर न थांबता ॲसिड स्प्रे दाखवत गंभीर धमकीही दिली. मात्र तरुणीने धैर्याने प्रतिकार करत आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा तपास सुरू असून, प्रवासी सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!