Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार; शिक्षकासमोर मित्राचा गळा चिरला, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातील क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार; शिक्षकासमोर मित्राचा गळा चिरला, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. क्लास सुरू असतानाच काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करत त्याचा गळा चिरला. या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये वाद विकोपाला गेला. दोन गटांत मारामारी सुरू झाली आणि अचानक एका विद्यार्थ्याने बॅगेतून चाकू काढून मित्रावर हल्ला केला. गळ्यात आणि मानेवर झालेल्या गंभीर जखमांमुळे विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. क्लासरूममध्ये हा रक्तरंजित थरार पाहून इतर विद्यार्थी आणि शिक्षक प्रचंड घाबरले.

हल्ला करून आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र जुना वाद किंवा गँगवार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे. खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

राजगुरूनगर पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत असल्याने शिक्षण संस्था आणि पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!