Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

LPG Cylinder Price Hike : बजेटआधीच महागाईचा झटका! एलपीजी सिलेंडर इतक्या रुपयांनी महागला; मुंबईत कितीला मिळणार गॅस?

LPG Cylinder Price Hike : बजेटआधीच महागाईचा झटका! एलपीजी सिलेंडर इतक्या रुपयांनी महागला; मुंबईत कितीला मिळणार गॅस?

LPG Cylinder Price Hike 1st February 2026 : आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र, अर्थसंकल्पापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून, ही दरवाढ आजपासून देशभर लागू झाली आहे.

या दरवाढीचा थेट परिणाम 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर झाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी या सिलेंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अर्थसंकल्पाच्या दिवशी कितीने वाढले दर?

नव्या महिन्याच्या सुरुवातीस अनेक आर्थिक बदल लागू होतात आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने नागरिकांना धक्का दिला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशीच व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योगांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

महानगरांमध्ये एलपीजी सिलेंडरचे नवे दर (19 किलो – व्यावसायिक)

  • मुंबई: 1,692 रुपये
  • दिल्ली: 1,740.50 रुपये
  • कोलकाता: 1,844.50 रुपये
  • चेन्नई: 1,899.50 रुपये

सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ

एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 111 रुपयांपर्यंत वाढ केली होती. त्या वेळी दिल्लीत किंमत 1,580.50 वरून 1,691.50 रुपये झाली होती. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही मोठी दरवाढ नोंदवली गेली होती.

घरगुती सिलेंडरच्या किमती ‘जैसे थे’

गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. 8 एप्रिल 2025 रोजी ठरवलेलेच दर आजही कायम आहेत.

  • मुंबई: 852 रुपये
  • दिल्ली: 853 रुपये
  • कोलकाता: 879 रुपये
  • चेन्नई: 868 रुपये

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!