Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग; 3 डब्बे जळाले, एक महिला प्रवासी जखमी

गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग; 3 डब्बे जळाले, एक महिला प्रवासी जखमी

Garib Rath Train Fire: अमृतसरहून सहरसाकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला शनिवारी सकाळी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सरहिंद रेल्वे स्थानकापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली असून, तीन सामान्य डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत एक महिला प्रवासी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेदरम्यान एका डब्यातून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. अल्पावधीतच आग इतर डब्यांमध्येही पसरली. तत्परतेने कामगिरी करत रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा – Nandurbar Accident : धनतेरसला सातपुड्यात भीषण अपघात, भाविकांच्या पिकअपवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

सरहिंद जीआरपीचे एसएचओ रतन लाल यांनी सांगितले की, डब्यातून धूर येत असल्याचे दिसताच चालकाने ट्रेन थांबवली. प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत तीन डब्यांचे नुकसान झाले असून, आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

रेल्वे मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी करत म्हटलं आहे की, आज सकाळी पंजाबमधील सरहिंद स्थानकावर 12204 अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्यात आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना पर्यायी सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे सुरक्षेविषयी प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!