Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल! राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांकडून मानद पदवी प्रदान

नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल! राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांकडून मानद पदवी प्रदान

Neeraj Chopra: ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (मानद) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित पदवी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर २०२५ रोजी साउथ ब्लॉक येथे झालेल्या पाइपिंग समारंभात प्रदान करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राला चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी झगडणाऱ्या भारतीय तरुणाईचे मूर्त रूप असे संबोधले. त्यांनी नीरजच्या कुटुंबीयांशी संवाद साधत या सन्मानाबद्दल अभिनंदनही केले.

भारतीय राजपत्रानुसार, नीरजची ही नियुक्ती १६ एप्रिल २०२५ पासून प्रभावी ठरली आहे. तो २६ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून रुजू झाला होता. क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी त्याला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार, २०२२ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक आणि २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

हेही वाचा –नीरज चोप्राने 88.16 मीटर भालाफेक करून पॅरिस डायमंड लीग जिंकली

अलिकडच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज ८४.०३ मीटरच्या थ्रोसह ८व्या स्थानावर राहिला. त्याचा सहकारी सचिन यादव ८६.२७ मीटरच्या थ्रोसह ४थ्या स्थानावर राहिला. नीरजने नंतर सांगितले की त्याला पाठीचा त्रास होता, परंतु तो पुढील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर लक्ष केंद्रित करत आहे. या स्पर्धेत त्याला पाकिस्तानच्या अर्शद नदीम कडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!