Agni Prime Missile: संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच देशाने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राइम या मध्यम-श्रेणीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली. 2000 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्रामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र प्रगत तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले असून, कोणत्याही पूर्वअटीशिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून गतिशीलपणे हलवता येते. यामुळे शत्रूपुढे अचानक आणि तात्काळ प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे.
India has carried out the successful launch of Intermediate Range Agni-Prime Missile from a Rail based Mobile launcher system. This next generation missile is designed to cover a range up to 2000 km and is equipped with various advanced features.
The first-of-its-kind launch… pic.twitter.com/00GpGSNOeE
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 25, 2025
विशेष डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित लाँचरवरून झालेल्या या पहिल्याच चाचणीत, कमी वेळेत आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. या यशामुळे भारत मोबाईल रेल्वे नेटवर्कवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करणाऱ्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली असून, भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ही झेप निर्णायक मानली जात आहे


