Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Leopard Attack: बिबट्याने घराच्या ओट्यावरून उचलून नेलेल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

Nashik Leopard Attack: बिबट्याने घराच्या ओट्यावरून उचलून नेलेल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

Nashik Leopard Attack: नाशिकमधील वडनेर परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने हादरला आहे. घराच्या ओट्यावरून उचलून नेलेल्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधानंतर आर्टिलरी सेंटरच्या जंगलात सापडला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाच्या निष्क्रीय कारभाराबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मंगळवारी संध्याकाळी श्रुतिक घराबाहेर खेळत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत त्याला जबड्यात पकडले आणि क्षणात जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. काही क्षणांत घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. आईचा आक्रोश संपूर्ण परिसराला हादरवून गेला, पण तोपर्यंत बिबट्या अंधारात गायब झाला होता.

हेही वाचा – बार्शी परिसरातून वाघ गेला, आता बिबट्या आला; हल्ला करत रेडक्याला केले ठार

लष्करी जवान, वन विभागाचे अधिकारी, थर्मल ड्रोन आणि श्वानपथक यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. सुमारे 300 जणांच्या प्रयत्नानंतर बुधवारी दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह जंगलात सापडला. मूळचे कर्नाटकचे असलेले श्रुतिकचे वडील गंगाधर हे आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करी जवान म्हणून कार्यरत आहेत. श्रुतिक हा त्यांचा एकुलता मुलगा असल्याने या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या महिन्यातही वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात आयुष भगत या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाने कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा एक निष्पाप जीव गेला आहे. नागरिकांनी वन विभागावर तीव्र संताप व्यक्त करत आता अजून किती बळी द्यावे लागणार? असा ज्वलंत सवाल उपस्थित केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!