Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pankaja Munde: ‘राजकारण संपलं की मी…’; गणेशानंद गडावर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली मनातील इच्छा

Pankaja Munde: ‘राजकारण संपलं की मी…’; गणेशानंद गडावर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली मनातील इच्छा

Pankaja Munde: राजकारणातील माझी इनिंग संपल्यानंतर मी भगवी पताका हाती घेईन आणि हरिभक्त पारायण (हभप) म्हणून सेवा करेन, असे सूचक आणि तितकेच भावनिक विधान राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील गणेशानंद गडावर आयोजित नारळी सप्ताहात त्या बोलत होत्या. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘तुमच्या प्रेमाची उतराई कातड्याचे जोडे करूनही होणार नाही’
लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळात कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाचा उल्लेख करताना पंकजा मुंडे कमालीच्या भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पराभवानंतर काही भावांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या, हे दुःख मोठे आहे. जनतेचे माझ्यावर इतके प्रेम आहे की, मी माझ्या स्वतःच्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले, तरी तुमच्या उपकारांची फेड होणार नाही.”

भगवान गडावरील मंदिरासाठी पदराने काढली दृष्ट
भगवान गडावर उभारण्यात येत असलेल्या माऊली मंदिरासाठी ज्या देणगीदारांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली, त्यांचे पंकजा मुंडे यांनी जाहीर आभार मानले. इतकेच नव्हे तर, या दातृत्वाने भारावून जात त्यांनी भर कार्यक्रमात देणगीदारांची आपल्या पदराने दृष्ट काढली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वारसा आणि संस्कार कधीही पुसू देणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा दिली.

परळीत ‘रामराज्या’चा संकल्प
रामनवमीच्या निमित्ताने परळीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः पाळणा हलवून श्रीरामाला अभिवादन केले. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने आदर्श राज्यकारभार केला, तसेच न्याय आणि सत्याचे ‘रामराज्य’ माझ्या परळीत यावे, हीच चरणी प्रार्थना आहे, असे त्या म्हणाल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!