Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: आदिती तटकरेंची मोठी घोषणा! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत मिळणार

Ladki Bahin Yojana: आदिती तटकरेंची मोठी घोषणा! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत मिळणार

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, यामुळे राज्यातील लाखो पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पुढील २-३ दिवसांत बँक खात्यात पैसे जमा होणार
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया तांत्रिक स्तरावर सुरू झाली असून, येत्या 2 ते 3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा होईल. विशेष म्हणजे, हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, त्यांना घरबसल्या या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यांनी आपली बँक खाती तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि दमदार वाटचाल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमागे महायुती सरकारचा दृढ निश्चय असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा सरकारवर असलेला विश्वास आणि या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!