Neel Bhalerao Record: पुण्यातील केवळ दीड वर्षांच्या नील निखिल भालेराव याने आश्चर्यचकित करणारी कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. नीलने फक्त 2 मिनिटे 53 सेकंद इतक्या कमी वेळेत जगातील 45 कार ब्रँड्स ओळखून दाखवले, आणि या विलक्षण प्रतिभेने परीक्षकांनाही थक्क केले. नीलचे वय केवळ दीड वर्ष असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रँड्सची नावे लक्षात ठेवणे आणि ती आत्मविश्वासाने सादर करणे ही अत्यंत उल्लेखनीय गोष्ट मानली जात आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा – पुणेकरांसाठी खुशखबर! खराडी ते खडकवासला आणि नळ-स्टॉप ते माणिक बाग मेट्रो मार्गाला मंजुरी
पालकांचे महत्त्वाचे योगदान
या यशामागे नीलची जिद्द जरी महत्वाची असली, तरी त्याचे पालक आई प्रेरणा भालेराव आणि वडील निखिल भालेराव यांनी दिलेले मार्गदर्शन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचीही मोठी भूमिका असल्याचे कुटुंबीय सांगतात. लहान मुलांमधील विशेष गुण ओळखून योग्य दिशा दिल्यास ते मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नीलची ही कामगिरी.
राज्याचा आणि देशाचा गौरव
नीलच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होताच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट पसरली आहे. एवढ्या लहान वयातील या तेजस्वी यशामुळे राज्याबरोबरच देशाचंही नाव उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


