पुणे: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरातील धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात दुकानदाराने सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागात ग्राहकाने थेट कोयता काढल्याचे दिसले. कोयत्याने त्याने दुकानातील सामानाची नासधूस केली. दुकानदारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पाच ते सहा जणांची टोळी
एका पान टपरीवर पाच ते सहा जणांची टोळी येऊन सिगारेट विकत घेते. सिगारेटचे पैसे मागितल्यानंतर टोळीतील एकाने कोयता बाहेर काढून दुकानाची तोडफोड करायला सुरुवात केली. दुकानातील सामान अस्तव्यस्त केले. दहशत निर्माण करुन त्याने सिगारेटचं पाकिटही चोरूलं. विमाननगर परिसरातील पान टपरी चालकावर झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडालीय. प्राथमिक माहितीनुसार सामान फुकट मिळवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटलं जातंय.
View this post on Instagram
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
आरोपींमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. घटनेनंतर व्यापारी आणि स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालंय. संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.


